Posts

Showing posts from February, 2019

आजोबा

दिवस तो तसा , वेगळाच होता काही, अचानक दूर होणार तुम्ही, असे वाटले सुध्दा नाही जसा आकाशातील एक तारा, धरतीवर आला, आणि निजलेल्या डोळ्यांना, स्वप्ने देऊन गेला स्वावलंबनाचा मंत्र देऊन, आत्मविश्वास रुजवणारे, स्वकर्तृत्वाची महती सांगून, महत्वाकांक्षेचे बीज पेरणारे कोणासाठी काहीतरी, निस्वार्थपणे करायचं, स्वतःच्या सुखापेक्षा, इतरांना सुखवायचं आयुष्याचा हाच मंत्र, सुखी करून गेला अगदी, मनी झालेली पोकळी मात्र, भरून येणार नाही कधी धावत पळत येऊन, कुशीत गुडूप होऊन जाणे, आकाशाच्या छताखाली, रात्री तारे पाहत बसणे शिकवलेल्या गोष्टी तुम्ही, आजदेखील आठवतात, अपयशाच्या पायऱ्यांवर, यशाचे धडे शिकवतात आठवण तुमची येता, कंठ अगदी दाटून येई, शब्दही अपुरे पडतील, अन् मन हे वाहून जाई