Posts

Showing posts from January, 2020

ती

निरागस होती ती मनाने, अगदी कोवळ्या फुलासारखी, शुभ्र मोगरा फुल म्हणावे, की निस्वार्थ लहान बाळासारखी नाजूक ओठ तिचे, जसे की फुलाच्या पाकळ्या, हसू तिचे भासे, जसे की उमलत्या त्या कळ्या सौंदर्याचे तिच्या गोडवे,खूप गायले जाई, जणू आभाळातून आलेली,ती एक गोड परीताई पण एका रात्री त्या कोवळीवर, काळाचे आघात झाले, त्या नराधमाच्या मलीन स्पर्शाने, शरीराचे लचके तोडले त्या काळरात्री तिच्या आयुष्याला, विचित्र असे वळण आले, तिच्या काचेसारख्या चारित्र्याचे, अगणित असे तुकडे झाले ती कोवळी कळी न उमलताच, कोमेजून गेली अगदी, तिचे सौंदर्य हा शाप होता, हे ती कळून चुकली होती