आयुष्य - एक फुल
माणसाचं आयुष्य, अगदी एका फुलासारखे असते, प्रत्येक फुलाचे उमलून, नंतर गळून जाणे ठरलेले असते आयुष्याच्या या फांदीवर, सुखाची फुले उमलतात, मात्र दुःख आणि अडचणींमुळे, ती नकळत गळून देखील पडतात फुले गळून पडल्यावर सुध्दा, झाडावर दुसरी फुले नव्याने उमलतात, तर गळून पडलेली फुले, मरतानाही सुगंध देऊन जातात तसेच अडचणींना न घाबरता, काहीजण नव्या उमेदीने फुलतात, नवी आशा उरी बाळगून, त्याचा सुगंध आयुष्यभर जपून ठेवतात