उंच माझा झोका : रमाबाई रानडे
इवलेसे हात हाती देऊनी, घेत्ये सख्या ही सप्तपदी, देवा अग्नी साक्ष ठेवुनी, सुख दुःखी साथ सोबती, हाती शिक्षणाचा वसा, साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात, झुले उंच माझा झोका. जन्मभराचे हे नाते, साथ त्याची ही आगळी, अर्थ संसाराचा न कळे, फुलकळी ती कोवळी, माहेरचे हे आंदण, चुके हृदयाचा ठोका, त्याच्या कृतार्थ डोळ्यात, झुले उंच माझा झोका. संसार तो दोन जीवांचा, नसे बाहुल्यांचा खेळ, दोन मनांचा नाही तर, असे कुटुंबांचा मेळ, अशा संसार गाण्याला, त्याचा माझा एक ठेका, त्याच्या कृतार्थ डोळ्यात, झुले उंच माझा झोका.