वळण

मनातील रेखाटलेल्या चित्राला,

आकार नक्की दे,

पण कुंचल्याने रंग भरायला,

थोडा अवधी घे.


तो असा हवा की तसा,

मी अशी हवी की तशी,

नव्या गोष्टींची चाहूल,

आयुष्यातील नवखे पाऊल.


विचारांचे हे काहूर,

मनी गुंतत गेले असे,

अर्धे माझे चित्र अजून,

पूर्ण होणार तरी कसे.

Comments