आठवणी
आयुष्यातील आठवणींची पाने, पहावी एकदा उलगडून,
अलगद येते हसू मुखावर, अन् मन येते भरून
ओठांवरील ते स्मितहास्य, सांगे आनंदाचे क्षण,
डोळ्यांमधील अश्रू बोलती, दुःखी किती हे मन
टिपून क्षण हे सारे, वाटे ठेवावेत कैद करून,
पण बावरे मन हे एकाएकी, जाते त्यातच रमून
कधी हव्या तर कधी नको, अशा कडुगोड आठवणी,
संग्रह सारा आठवणींचा, वसे खोल अंतरी

Sundar👌
ReplyDelete