तो

 सगळ्यांसमोर इतरांना आधार देणारा,

आणि एकटे आपले मन हलकं करणारा असा तो


जन्मताच अपेक्षित नजरेत वेढलेला,

आणि अपेक्षांचे ओझे वाहत आयुष्य जगतो असा तो


कुटुंबासाठी सतत झुरत असलेला,

आणि कुटुंबाला त्रास होऊ नये हा ध्यास असलेला असा तो


वरवर नेहमीच खंबीर वाटत असलेला,

पण आतून खूपच हळवा असलेला असा तो


तुझा आनंद तोची माझा, असे म्हणणारा,

कधी पती, कधी पिता तर कधी सखा असा तो


(Men's Day Special)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वळण